INTERNATIONAL CONFERENCE ON TRANSFORMING LIBRARIES (ICTL) 2023:
NEP 2020 AND CHANGING PARADIGM IN LIS EDUCATION SYSTEM
गौरवग्रंथ
ग्रंथवीर: सन्मान एका गुरूचा
आपणास कळविण्यात येत आहे की, सन्माननीय श्री डॉ. धर्मराज क. वीर, संचालक, ज्ञान स्रोत केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी ग्रंथालय सेवेची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहेत. हा अमृतयोग साधून त्यांनी केलेली ग्रंथ सेवा, प्रशासकीय सेवा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याची दखल घेतली जावी असे त्यांचे महनीय योगदान आहे. महाराष्ट्रामधील अनेक ग्रंथपालांना व ग्रंथालय व्यावसायातील मान्यवरांना सतत मार्गदर्शन करणारे आदरणीय गुरुवर्य डॉ. धर्मराज क. वीर त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ म्हणून सेवा गौरव समितीने त्यांच्या गौरवार्थ एक गौरवग्रंथ प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. “ग्रंथवीर” असे या गौरवग्रंथाचे नाव आहे. या गौरवग्रंथाला संदर्भमूल्य प्राप्त होण्यासाठी आपल्या अभ्यासपूर्ण लेखाची अपेक्षा आहे. त्यांच्या कार्याबद्दल व त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आपले अनुभव हे लेखनाद्वारे या गौरव ग्रंथात समावेश व्हावा यासाठी आपणास लेख लिहिण्यासाठी आवाहन करत आहोत.
लेखा चे विषय:
-
डॉ. धर्मराज क. वीर यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व याविषयी आपले लेख किंवा अनुभवकथन लिहू शकता.
-
डॉ. धर्मराज क. वीर यांचे शालेय योगदान , महाविद्यालय, विद्यापीठ , सार्वजनिक ग्रंथालयातील योगदान.
-
डॉ. धर्मराज क. वीर यांनी संशोधक विद्यार्थीचे संशोधनपूरक पुरविलेल्या सेवा विषयक मत.
-
डॉ. धर्मराज क. वीर यांनी संशोधनसाठी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या माहिती सेवा.
ई-मेल- krcdrbamu@gmail.com
वरील ई-मेलवर आपले लेख पाठवावे.
आपला निबंध MS-Word मध्ये मराठी- Unicode किंवा Mangal, Font size 14 मध्येच पाठवावा.
निबंधाची शब्द मर्यादा : 2000 शब्दांची असावी.
लेखा वर आपले पूर्ण नांव व पत्ता, मोबाईल नंबर व ई-मेल आय.डी. आवश्यक आहे.
लेख फक्त मराठी व हिन्दी असावे.
आपले विनीत,
डॉ. धर्मराज वीर सेवागौरव सोहळा समिती,
संपर्क :-9422219642 / 9145424374 / 814942437